कोल्हापूर (पन्हाळा ) प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी चे नुकतेच कोल्हापूर जिला कार्यकारणी जाहीर झाली .या मध्ये पन्हाळा तालुका अध्यक्ष पदी अमर सिंह प्रताप सिंह भोसले यांची निवड करण्यात आली .या बद्दल आसुर्ले पोर्ले गावा तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला .तसेच या प्रसंगी आसुर्ले गावातील धनगर समाजातील राजलक्ष्मी हजारे हिने भारतीय डाक विभागात तील परीक्षा उत्तीर्ण झाली. त्या बदल तिचा हि सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्तविक सरपंच शॉकत आगा यांनी केली प्रमुख पाहुण्याचा सत्कार उदयसिंह सरनोबत सरकार यांच्या हस्ते करण्यात आला .या प्रसंगी अमरसिंह प्रतापसिंह भोसले यांनी मत मांडले “समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचा मी प्रयंत्न करीन, तसेच पक्ष च्या माध्याम तुन वेगवेगळे अभियान राबवण्याचा प्रयत्न करेन .सर्वानी याचा लाभ घाय्वा”
यावेळी सागर महाराज ,कुमार शिंदे ,शरद पवार,,विनोद दिनकर पाटील ,शिवाजी माने ,वसंतराव बापू ,बाळासाहेब जाधव ,सर्वेश्वर जाधव ,कृष्णात जाधव ,सरनोबत सरकार कुटंबीय तसेच गावातील भजनी मंडळ सदस्य उपस्तित होते.