इंडियाज बेस्ट डान्सर 3 मध्ये विकी कौशलने कबूल केले “मोजे घालून डान्स करण्याची मला प्रचंड भीती वाटते.”

मनोरंजनाने भरलेली रात्र अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, कारण अत्यंत देखणा विकी कौशल, माजी विश्व सुंदरी मानुषी चिल्लरसोबत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या डान्स रियालिटी शोमध्ये आपल्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. स्पर्धक एकापेक्षा एक परफॉर्मन्स देऊन टॉप 6 मध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज आहेत.

या भागात अनिकेत चौहान या स्पर्धकाचा सोलो अॅक्ट पाहून विकी आणि मानुषी हे दोन्ही आमंत्रित कलाकार अवाक झाले. अनिकेतने ‘सावरिया’ या सुमधुर गाण्यावर आपल्या पदन्यासातून जणू जादूच विणली! ‘बेहतरीन 13’ मध्ये थेट प्रवेश मिळवल्यानंतर दर आठवड्याला आपल्या असामान्य मूव्ह्ज दाखवून, प्रेक्षकांचे कौतुक मिळवत अनिकेतने हे वेळोवेळी सिद्ध केले आहे की टॉप 6 मध्ये स्थान मिळवण्याची त्याची पात्रता आहे.

अनिकेतचा अप्रतिम अॅक्ट पाहून थक्क झालेल्या विकी कौशलने टिप्पणी केली, “अगदी पहिल्या बीटपासून थेट शेवटच्या बीटपर्यंत तू या मंचावर नायकासारखा वावरलास. मोहकता, डौल, मौज आणि मस्ती – हे सर्व काही होते, त्या प्रत्येक बीटमध्ये. मोजे घालून डान्स करण्याची मला स्वतःला प्रचंड भीती वाटते. मला तर वाटते की 5 मिनिटे देखील मी ते करू शकणार नाही. तू मात्र आपल्या अॅक्टमध्ये पायात मोजे घालून इतका सराईतपणे नाचलास! तू घसरशील अशी मला सारखी भीती वाटत होती. मंचावर तू घसरत होतास, ते खरोखर घसरत होतास की तो अॅक्टचा भाग होता हे सांगणे कठीण आहे. अनिकेत तुझे हसणे खूप मोहक आहे. तुझा अॅक्ट संपूच नये असे मला वाटत होते. त्यातील प्रत्येक क्षण मला भावला. तुझ्याकडे पाहताना मला एक प्रेमात पडलेल्या तरुणाला स्वच्छंद अवस्थेत बघत असल्यासारखे वाटत होते. फारच छान!”
मानुषी चिल्लर देखील तितकीच प्रभावित झाली होती. तिने अनिकेतकडे स्वाक्षरी मागितली. ती म्हणाली, “अनिकेत तुझ्या हालचालीतील सहजता फार मोहक होती. हे सगळे असे सहज, अलगद असल्याचे भासवणे सोपे नाही. पण तू ते सहज करून दाखवलेस. या स्पर्धेत तू इथवर पोहोचला आहेस हीच तुझ्या प्रतिभेची पावती आहे. चांगला परफॉर्मन्स तो असतो, ज्यात प्रेक्षक भावना अनुभवतो आणि मला त्या भावना जाणवल्या. तुझे हसणे खरोखर फार लोभस आहे. मला असे ठामपणे वाटते आहे की, तू नक्की एक सुपरस्टार होणार! आणि इतर लोक तुला स्वाक्षरीसाठी गराडा घालतील, त्याआधी तू मला आत्ताच स्वाक्षरी देशील का? मी तुझी फॅन आहे.”

बघा, इंडियाज बेस्ट डान्सर 3 या शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top