कोल्हापूर- डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केमिकल विभागाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी अथर्व माधव चाफले याने ‘मॅन्युपलेशन ऑफ लाईट युसिंग न्यानोफोटोनिक वेव्हज’ या नाविन्यपूर्ण विषयावर आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे.
युरोपियन कमिशनच्या स्कॉलरशिप अंतर्गत अथार्व 45 दिवसासाठी या प्रकलपासाठी निवड झाली होती. अथेन्समधील जगप्रसिद्ध हेलनिक अमेरिकन विद्यापीठात (ग्रीस) जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डायरेक्टर- इन्फॉर्मेशन अँड इंजिनीअरिंग पेनोटीस कालोजोमिस यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हा प्रकल्प पूर्ण करून याच विषयावर शोधनिबंध ही सबमिट केला.
जागतिक ख्यातीच्या या विद्यापीठामध्ये आंतरशाखीय विषयावर शोधनिबंध सादर करणारा अथर्व महाविद्यालयाचा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. विश्वनिकेतन मुंबईचे विश्वस्त डॉ एस एस इनामदार ,अधिष्ठाता रीसर्च डॉ अमरसिंह जाधव व महाविद्यालयाच्या संशोधन विभागाने मार्गदर्शन लाभले.
संशोधन प्रकल्प पूर्ण केल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ.संतोष चेडे यांनी अभिनंदन केले.