राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू : श्री.राजेश क्षीरसागरराजारामपुरी येथील शाखेचे दिमाखात उद्घाटन

कोल्हापूर दि.०४ : कोल्हापूर हे कलानगरी सह क्रीडानगरी म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात शहरातील सर्वच खेळाच्या उपलब्ध सुविधा आणि मैदानांच्या दुरावस्थेचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, मैदानांचे नूतनीकरण व्हावे यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून खेळाडूंना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राजारामपुरी परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध असणारा एकमेव जलतरण तलाव गेल्या काही वर्षापासून बंद असून, त्यामुळे जलतरणपटूची गैरसोय होत आहे. याबाबत तात्काळ महापालिका आयुक्तांशी बैठक घेवून, राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नामदार श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली.
राजारामपुरी येथील शिवसेना शाखेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नामदार श्री.राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते दिमाखात पार पडला. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही नामदार श्री.क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो” अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस बोलताना माजी महापौर दीपक जाधव यांनी, कोल्हापूर जिल्ह्याला राज्य नियोजन मंडळाची कार्यपद्धती काय असते याची माहिती न्हवती. परंतु श्री.राजेश क्षीरसागर यांच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला या पदाची आणि त्यामाध्यमातून होणाऱ्या विकास कामांची माहिती मिळाली. यापूर्वी जिल्ह्यास एक – दोन कोटींचे निधी मिळायचे आणि त्याची जाहिरातबाजी व्हायची. पण, आता श्री.राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळत आहे. आगामी काळातही श्री.राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा व्यक्त करत राजारामपुरी परिसरातील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी श्री.राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनेचे संपर्क कार्यालय, शाखा हे जनसेवेचे मंदिर असून, लोकांना न्याय देण्यासाठीच अशा मंदिरांची स्थापना शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढताना शिवसेनेने लाखो लोकांना न्याय मिळवून दिला. यातूनच शिवसेनेचे संघटन मजबूत होत गेले. सन १९८६ साली कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे रोपटे लावले. जेष्ठ शिवसैनिकांच्या साथीने याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनेच्या शाखा, कार्यालये यातून गोरगरीब, कष्टकरी नागरिकांची सेवा होते. या शाखांच्या माध्यमातून आरोग्याच्या, शैक्षणिक, महिला सबलीकरणाच्या, जेष्ठ नागरिकांच्या योजना राबवाव्यात, असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले कि, संयुक्त राजारामपुरी संघटनेच्या माध्यमातून राजारामपुरी परिसरातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकजुटीने सुरु असलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. यापूर्वीही राजारामपुरी परिसरातील मुलभूत सोयी सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांची निधी दिला आहे. आगामी काळात संयुक्त राजारामपुरीच्या माध्यमातून राजारामपुरी परिसराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात यावा. त्यास निधी देवून राजारामपुरी परिसरातील विकासास प्राधान्य देवू, असेही आश्वासित केले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, जेष्ठ शिवसैनिक सुशील देसाई, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रहीम सनदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, संयुक्त राजारामपुरी अध्यक्ष अनुप पाटील, वडार समाजाचे अध्यक्ष तानाजी पोवार, महिला आघाडीच्या मंगलताई साळोखे, पूजा भोर, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, मंगल कुलकर्णी, उपशहरप्रमुख मंदार तपकिरे, अश्विन शेळके, आकाश सांगावकर, शाखाप्रमुख अनिल कलकुटकी, उपशाखाप्रमुख महेश उर्फ राजू यादव, महिला संघटिका सुनिता निपाणीकर, अतुल सांगावकर, राहुल शिंदे, सचिन नलवडे, तुकाराम पाटील, जयवंत आडनाईक, सुनील पाटील शिवसेना पदाधिकारी, परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रति,
मा.संपादकसो,
दैनिक/वृत्तवाहिनी/वेबपोर्टल
वरील बातमी प्रसिद्धीस देवून सहकार्य करावे, ही विनंती.
आपला,
नंदू सुतार,
कार्यालयप्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top