मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर ‘बॉईज’च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘बॉईज ३’च्या भरघोस यशानंतर आता ‘बॉईज ४’ धमाका करायला येत आहेत. नुकतेच ‘बॉईज ४’चे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून ‘आपण येणार तर धमाका होणार’ असं म्हणत ‘बॉईज ४’ येत्या २० ऑक्टोबर सर्वांच्या भेटीला येत आहेत. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ४’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत.
यापूर्वी ‘बॉईज’च्या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालता होता. आता यंदाच्या वर्षी धैर्या, ढुंग्या आणि कबीर काय धमाका करणार आहेत, हे पाहाण्याची सर्वांनाच आता उत्सुकता लागली आहे.
‘बॉईज ४’ बद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, ” आतापर्यंत ‘बॉईज’च्या तिन्ही भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. या तिन्ही भागांमध्ये काहीतरी सरप्राईस होते. ‘बॉईज ४’ मध्येही असेच सरप्राईस आहे. प्रेक्षकांचे मिळणारे प्रेम पाहूनच आम्हाला ‘बॉईज ४’ करण्याची प्रेरणा मिळाली. मला खात्री आहे, हा चित्रपटही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करेल.”