राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू : श्री.राजेश क्षीरसागरराजारामपुरी येथील शाखेचे दिमाखात उद्घाटन
कोल्हापूर दि.०४ : कोल्हापूर हे कलानगरी सह क्रीडानगरी म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात शहरातील सर्वच खेळाच्या उपलब्ध सुविधा आणि मैदानांच्या दुरावस्थेचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, मैदानांचे नूतनीकरण व्हावे यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून खेळाडूंना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राजारामपुरी परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध असणारा एकमेव जलतरण तलाव गेल्या काही