दि.१० सप्टेंबर २०२३ मध्यरात्री पुसेसावळी आक्षेपार्ह पोस्ट मुळे समाजकंटकांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळाची विटंबना तर केलीच त्याचबरोबर निष्पाप युवकाची हत्या केली व एक युवक अद्याप मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रात होणे निंदनीय असून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहोत.
या घटनेत शहिद झालेल्या युवकांच्या कुटुंबास ५० लाख रूपये रोख रक्कम तसेच गंभीर जखमी असलेल्या युवकाच्या कुटुंबांस २५ लाख रुपये रोख रक्कम देण्यात यावी.त्याचबरोबर ज्या समाजकंटकांनी हे कटकारस्थान घडवून आणले त्यांना कठोर शासन व्हायला हवे जणे करून महाराष्ट्रात पुन्हा मॉब लिंचीग सारख्या घटना होऊ नयेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान या प्रसंगी हाफिज समीर उस्ताद, उपाध्यक्ष जमीअत उलमा शहर कोल्हापूर
हाफिज जावेद शेख सचिव जमीअत उलमा शहर कोल्हापूर
मौलाना इम्रान सय्यद,गुलाब भाई मुजावर,हाफिज शहजादा
हाफिज सद्दाम,हाफिज फय्याज,हाफिज हैदर सोलकर,हाफिज युनूस जमादार,हाफिज हैदर बागवान,हाफिज इस्लाम,हाफिज साहिल,हाफिज आरिफ आदि मान्यवर उपस्थित होते.