कोल्हापूर प्रतिनिधी:
घरगुती गणपती व सर्व मंडळाचे गणपती भक्ती भावाने ,श्रद्धेने विसर्जित करण्यात आले ,
पण विसर्जनाच्या मिरवणुकीत एक वेगळाच अनुभव आज उंचगावकरांनी अनुभवला तो म्हणजे डॉल्बीचा प्रचंड असा आवाज , सहन न होणारे लेझर लाईट व लहान मुले, गरोदर स्त्रिया ,वरिष्ठ नागरिक यांच्या बद्दल जरा सुद्धा भावनिक विचार न ठेवता वेगवेगळ्या कर्कश आवाजामध्ये तरुण वर्ग नाचताना दिसून आले.तसेच
या विसर्जन मिरवणुकी मध्ये डॉल्बीचा प्रचंड व विचित्र असा वापर करण्यात आला.
प्राथमिक माहिती मध्ये मंडळांनी डॉल्बी लावले होते अंदाजे 120 डिसिबल पेक्षा जास्त आवाज सोडण्यात आलेला होता.
पोलीस प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देते व कोणती कडक कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे अशी चर्चा नागरिकातून होत आहे.
तसेच मिरवणुकीच्या वेळी विद्युत पुरवठा बंद करून उंचगावातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत करण्यात आले होते.
संघर्ष तरुण मंडळा तर्फे सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले व शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच भाजपा या पक्षांच्या प्रमुख मंडळींनी प्रत्येक मंडळाचे नारळ, टोपी ,पान ,सुपारी देवून स्वागत केले..
मिरवणूक नियमानुसार 10 वाजता सर्व डॉल्बी आणि पारंपरिक वाद्य बंद करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाई नंतर उंचगावच्या मंगेश्वर मंदिर परिसरात सर्व मंडळांचे कार्यकर्ते आणि नेते यांनी डॉल्बीला पुन्हा परवानगी द्या अशी मागणी केली. नेत्यांनी डीजेच्या मागणीसाठी जोर धरला होता. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी अधिकचा फौजफाटा बोलावून तणाव शांत केला.
त्यानंतर 1 वाजताच्या दरम्यान काही मंडळांनी विना डॉल्बी गणपती मिरवणूक काढत विसर्जनासाठी तयारी दर्शवली. रात्री उशिरा हा सर्व मंडळांनी गणपती विसर्जन केले.
या शहरालगत च्या उंचगाव मोजून 25ते 30 मंडळाची विसर्जन मिरवणूक मध्ये पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरतच करावी लागली.
पुढील आठवडयात कोल्हापूर जिल्हा ची विसर्जन मिरवणूक संपन्न होणार आहे याचे नियोजन पोलीस प्रशासन कसे करणार??? अशी नागरिक मधून चर्चा होत आहे.